सप्तशृंगी गडावर काँक्रीट बांधावा लवकर व्हावा ग्रामस्थांची मागणी...
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगीगडावर दरवर्षी उन्हाळा सुरु होताच भेडसावणारी पाणीटचाईची समस्या दूर करण्यासाठी नवीन गेटेड सिमेंट काँक्रिट बंधारा बांधण्यास प्रादेशिक जलसंधारण अधिकारी , मृद व जलसंधारण विभाग , नाशिक यांची तांत्रिक परवानगी मिळाली आहे . प्रस्तावित बंधाऱ्यांच्या जागेची मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली आहे . दरम्यान याबाबतचा अंतिम प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी दिली आहे . सप्तशृंगीगडावर दरवर्षी एप्रिल , मेव जून महिन्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते . गडावर तत्काळ नवीन सिमेंट बंधायास जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी मंजुरी द्यावी , अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी केली आहे .
सप्तशृंगीगडावर भवानी पाझर तलाव हा पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे . या पाझर तलावातील तीन वर्षांपूर्वी गाळ काढून खोली वाढविण्यात आली आहे . गळती थांबविण्याचेही काम करण्यात आले आहे ; मात्र दरवर्षी भाविकांची संख्या वाढत आहे . त्यामुळे गडावर उपलब्ध असलेले पाणी कमी पडत आहे . त्यामुळे २०१८ मध्ये श्री . गवळी यांनी जिल्हा नियोजन समितीकडे एक कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करून तीर्थक्षेत्र विकास किंवा आदिवासी उपाययोजनेतून निधी देण्याची मागणी केली होती . कृषिमंत्री दादा भुसे व आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून गेटेड सिमेंट काँक्रिट बंधाऱ्यासाठी १ कोटी ४१ लाख १६ हजार ४३२ रुपयांचा नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला आहे . मृद व जलसंधारण उपविभाग सटाणा येथील अधिकारी आर ए . कोळगे , टी . आर . गुंजाळ , टी एस . गांगुर्डे , आर . बी . डोंगरे यांनी सप्तशृंगगडावर जागेची पाहणी केली आहे . विश्वस्त ललित निकम , डॉ . देवरे , मनजोत पाटील , भूषण राज तळेकर , दीपक पाटोदकर , सरपंच रमेश पवार , सदस्य राजेश गवळी , सदस्य दत्तू बडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे, योगेश कदम , शांताराम गवळी , आदी उपस्थित होते .
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....

